पावसाळी कामे सुरू असतांना चोरट्यांकडून शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकांनाना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. सिन्नर येथे चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडत तीन लाखांहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मालेगावात दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; एक जण ताब्यात
सिन्नर परिसरातील दापुर येथे गोविंद केदार यांचे श्रीराम कृषी केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी केंद्र फोडत दुकानातील २५ हजार किंमतीचा लॅपटॉप, एक लाख ६० हजार रुपये किंमतीचे बेनिव्हा कंपनीच्या औषध बाटल्या, लुना बाायर कंपननीच्य औषधाच्या बाटल्या, डिलीकेट नावाचे डीओडब्ल्यू कंपनीच्या औषधाच्या बाटल्या असा तीन लाख ४५ हजार किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.