नाशिक : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिने, मद्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संजय लोखंडे यांचे बंद घर फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा दोन लाख, ४९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. लोहशिंगवे येथे शंकर डांगे यांचा बिअर बार व हॉटेल आहे. चोरांनी दुकान फोडत विविध विदेशी कंपनीच्या ६१ मद्याच्या बाटल्या चोरल्या. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत अक्षय गुरूळे यांच्या मालकीचे १० मीटर लांबीचे लोखंडी खांब लंपास करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burglary at three places in the district items worth lakhs of rupees stolen ysh