शहरातील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या व्यापार्याची सुमारे आठ लाख रोकड असलेली थैली दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी एसआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी भागातील रहिवासी ईश्वर मेघानी यांचे दाणा बाजारात सुकामेवा विक्रीचे दुकान आहे. रोजचे काम आटोपून ते रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीने घरी निघाले होते. त्यांच्याजवळ थैलीमध्ये आठ लाखांची रोकड, भ्रमणध्वनी, लॅपटॉप होता. पांडे डेअरी चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील वळणरस्त्यावर दबा धरून बसलेल्या एकाने त्यांना अडविले. चोरटा रोकड भरलेली थैली हिसकावून दुचाकीस्वार दुसर्या तरुणासोबत पसार झाला. मेघानी यांनी आरडाओरड करताच एका तरुणाने त्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे नेरी नाक्याजवळील स्मशानभूमीकडून पसार झाले.
हेही वाचा – नाशिक, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांविरुध्द कारवाईचे संकेत
हेही वाचा – नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील अग्निशमन सिलिंडर पुनर्भरणाच्या प्रतिक्षेत
घटनेची माहिती मिळताच रात्री दहाच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी करीत माहिती घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांची पथके तपासकामी रवाना करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.