लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: पांजरापोळ संस्थेच्या जागेत आश्रयासाठी ठेवण्यात आलेल्या १११ पैकी १२ उंटांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून केवळ ९९ या ठिकाणी उरले आहेत. राजस्थान येथील रायका संस्थेचे सहकारी १६ दिवसानंतर पांजरापोळ येथून ९८ उंट घेऊन राजस्थानकडे शुक्रवारी रवाना झाले. एक उंट अशक्तपणामुळे पांजरापोळमध्येच ठेवण्यात आला. मजल, दरमजल करीत हे उंट दीड महिन्यानंतर राजस्थानात पोहचणार आहेत. त्यांच्या देखभालीसाठी स्थानिक पातळीवर पशुवैद्यकीय पथक सोबत राहणार आहे.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

चार मे रोजी जिल्ह्यातून जात असलेल्या उंटांची माहिती प्राणीप्रेमींना मिळाली होती. या जिल्ह्यात उंट का आले, कुठे चालले, याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने १११ उंट जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पांजरापोळ संस्थेला देण्यात आली होती.

हेही वाचा… जळगावात पुन्हा पाणीबाणी, शनिवारी पाणी पुरवठा बंद

हजारो किलोमीटर दूरवरून पायपीट करून आलेल्या उंटांपैकी बहुतांश अन्न, पाण्यावाचून अशक्त झाले होते. त्यातच वातावरणातील बदलामुळे पांजरापोळ येथे १२ उंटांचा मृत्यू झाला. हे उंट राजस्थानातच नेणे योग्य राहील, यादृष्टीने प्राणी मित्रांसह पांजरापोळ संस्थेने उंट घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. यानंतर राजस्थानमधील रायका संस्थेने सदर उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते. त्यानुसार राजस्थानातून उंटांना सांभाळणारे सात रायका कार्यकर्ते गुरुवारी पांजरापोळ येथे दाखल झाले.

हेही वाचा… डॉ. राम ताकवलेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी शोकसभा

शुक्रवारी सकाळी पशु संवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉ. वैशाली थोरात, डॉ. साखरे यांनी पांजरापोळ येथे भेट दिली . या नंतर व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांना पत्र मिळाले. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र रायका संस्थेच्या प्रतिनिधींना दिल्यानंतर उंट राजस्थानकडे रवाना झाले. उंट दिंडोरी-वणी-धरमपूरमार्गे राजस्थानकडे जाणार आहेत. यात दररोज २० ते २५ किलोमीटर त्यांचा प्रवास होईल. दरम्यान, शुक्रवारी ९९ उंटांपैकी एक उंट प्रवेशद्वाराजवळ जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पांजरापोळ येथे ठेवून घेण्यात आल्यानंतर ९८ उंटाचा ताफा पुढे सरकला. दीड महिन्यात ते राजस्थान गाठतील. या कालावधीत त्यांना आरोग्य विषयक त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या मार्गातील स्थानिक पशुवैद्यकीय पथक तालुका सिमेपर्यंत सोबत राहणार आहे.