धुळे – जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व संबधित यंत्रणेने सामूहिक धडक मोहीम राबवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बनावट वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता गठित जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात त्रैमासिक बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

हेही वाचा – ठाणे : नाल्यात पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका

केकाण यांनी सांगितले की, बनावट डॉक्टर शोध मोहिमेसाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. अशा डॉक्टरांबाबत गावात माहिती होण्याकरीता नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच जिल्हास्तरावर सर्व डॉक्टर, वकील, पोलीस विभाग आणि त्या संबधित सर्व यंत्रणांसाठी कार्यशाळा घेऊन त्यात बनावट डॉक्टरांबाबात राबवावयाची धडक मोहिमेची रुपरेषा ठरवावी. यंत्रणेने अशा डॉक्टरांच्या तपासणीसाठी शासनाने गठित केलेल्या तालुकास्तरीय समितीमार्फत विशेष मोहीम राबवावी. पुढील १५ दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच काही संवेदनशील भागात बनावट डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष कृती दल गठित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनीही आपल्या परिसरात बनावट डॉक्टर व्यवसाय करीत असल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तपशील देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campaign to find fake doctors in dhule district ssb
Show comments