नाशिक: मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या धर्तीवर आता संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया राबवली जाणार असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

या मोहिमेत तपासलेली कागदपत्रे आणि नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यात येणार आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा राज्यभरात वाढविण्यात आली आहे. मागासवर्ग आयोगाला सांख्यिकी माहिती (इम्पॅरिकल डेटा) साठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत या संदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली गेली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा… तुझ्या कष्टाचे चांगले फळ मिळाले… अहमदनगरमध्ये एक कोटी हाती पडताच अभियंत्यांमधील संभाषण

शासन निर्देशानुसार तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी केली जाईल. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्याचे स्कॅनिंग करुन जतन करण्यात येणार आहे. तपासलेली कागदपत्रे व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात प्राप्त करुन विभागीय समिती व जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकास्तरावर संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ हे सदस्य सचिव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका, हे सदस्य असणार आहेत.

हेही वाचा… लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यात मंडळ अधिकाऱ्यास अटक

उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ तालुक्यात तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे समितीचे सदस्य सचिव असून उपायुक्त सामान्य प्रशासन (मनपा)/ मुख्याध्याकारी (नगरपालिका/नगर पंचायत), गटशिक्षण अधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख, पोलीस निरिक्षक, विस्तार अधिकारी (पंचायत समिती), सहदुय्यम निबंधक/दुय्यम निबंधक, नायब तहसीलदार (प्रशासन) हे सदस्य असणार आहेत.

Story img Loader