नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर अर्ध्या तासाच्या पावसात कालव्यासदृश स्थिती निर्माण होण्यामागे कमी क्षमतेची निचरा व्यवस्था आणि त्यात अडकलेल्या कचरा-मातीमुळे निचरा होण्यात आलेले अडथळे, ही प्रमुख कारणे असल्याचे उघड झाले आहे. शहरातून जाणाऱ्या सहा किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावर सध्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चार इंच क्षमतेच्या वाहिन्यांची व्यवस्था आहे. मुसळधार पावसात ती अपुरी असल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचआय) आता तिची क्षमता विस्तारण्याचे निश्चित केले आहे.

सोमवारी दुपारी शहरात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. आजवर असा पाऊस झाला की, उड्डाण पुलावरून सेवा मार्गावर कोसळणाऱ्या जलधारांशी शहरवासीय परिचित होते. काही ठिकाणी वेगाने कोसळणाऱ्या जलधारांमुळे सेवा रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत होते. यावर बराच गदारोळ झाल्यानंतर प्राधिकरण पुलावरील व्यवस्थेची दुरुस्ती करीत नाही तोच, सोमवारच्या पावसाने नवीन प्रश्न समोर आणले. केवळ अर्ध्या तासाच्या पावसात द्वारका ते क. का. वाघ महाविद्यालयादरम्यान उड्डाणपूलास कालव्याचे स्वरुप प्राप्त झाले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील या पुलावर कंबरेइतके पाणी साचल्यामुळे शेकडो मोटारी अडकून पडल्या होत्या. महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याचा निचरा तत्काळ होण्याची चिन्हे दिसत नसल्याने वाहतूक पोलिसांनी अडकलेल्या वाहनधारकांना माघारी बोलवत शहरातील सेवा रस्ते व पर्यायी मार्गाने पुढे मार्गस्थ होण्याचे नियोजन केले. यामुळे शहरातील अन्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण आला. वाहतूक व्यवस्था कोलमडली.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

आणखी वाचा-तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

दरम्यानच्या काळात प्राधिकरणची यंत्रणा पुलावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यप्रवण झाली. दोन ते अडीच तासानंतर पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरळीत झाली. सहा किलोमीटरच्या उड्डाण पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था कार्यान्वित आहे. अतिशय कमी वेळात अधिक पाऊस झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे प्राधिकरणचे म्हणणे आहे. परंतु, पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीत कचरा व माती अडकल्याने पुलावर पाणी तुंबल्याची साशंकता वाहतूक पोलिसांसह वाहनधारकांनी व्यक्त केली. पुलावरील या स्थितीविषयी वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाला सूचित केले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांचे अवलोकन करीत कारणमिंमासा केली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने खालील भागात पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेची क्षमता अपुरी पडली. त्यामुळे या वाहिनीची क्षमता विस्तारली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणचे अधिकारी पी. आय. फाल्गुने यांनी दिली.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर द्वारका ते क. का. वाघ महाविद्यालयादरम्यान पावसाचे पाणी साचल्याने सोमवारी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अडकलेल्या वाहनधारकांना शहरातील पर्यायी मार्गाने पुढे मार्गस्थ करण्यात आले. पुलावर स्थितीबाबत वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचित केले आहे. -चंद्रकांत खांडवी (उपायुक्त, वाहतूक)

Story img Loader