लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह काही उमेदवारांनी मतपत्रिकेत आपले नाव वरच्या क्रमांकावर येण्यासाठी केलेली धडपड यशस्वी झाली आहे. गोडसे यांचे नाव उमेदवारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, त्यांच्यासह काही उमेदवारांनी मतपत्रिकेत नाव कसे हवे, हा पर्याय अर्जाद्वारे निवडला. त्यामुळे गोडसे यांचे नाव मतपत्रिकेत दुसऱ्या क्रमांकावर आले. अन्य तीन ते चार उमेदवारांच्या क्रमवारीतही बदल झाले. या बदलानुसार क्रमवारी पाठविल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नाशिक लोकसभेची मतपत्रिका अंतिम केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिंडोरी मतदारसंघात मात्र मतपत्रिकेतील उमेदवारांच्या क्रमवारीत असे कुठलेही फेरबदल झाले नाहीत.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट

नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्ष तसेच अपक्षांसह एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. माघारीनंतर यंत्रणेने उमेदवारांची यादी तयार केली होती. मतपत्रिकेत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त उमेदवारांना वरचे स्थान असते. उमेदवाराने नमूद केलेल्या पहिल्या नावातील मराठी आद्याक्षरानुसार (मूळ नाव अथवा आडनाव) क्रम निश्चित केला जातो. त्यानुसार ‘हेमंत गोडसे’ हे तिसऱ्या क्रमांकावर होते. उमेदवारांची मतपत्रिकेतील क्रमवारी अंतिम करण्यासाठी आयोगाच्या निकषानुसार उमेदवारांना अर्ज क्रमांक चारचा पर्याय असतो. या माध्यमातून मतपत्रिकेत आपले नाव कसे हवे, हे त्यांना निवडता येते. या माध्यमातून गोडसे यांनी आडनाव आधी आणि मूळ नाव नंतर म्हणजे ’गोडसे हेमंत‘ असे बदल सुचविले. त्यामुळे आधीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले. अन्य तीन, चार उमेदवारांनी असे बदल सूचवित मतपत्रिकेत आपले नाव वर राहील, याची काळजी घेतली.

आणखी वाचा-दिंडोरीत बाबू भगरे अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह, मविआच्या भास्कर भगरे यांना त्रासदायक

या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उमेदवारांनी दिलेल्या अर्जानुसार क्रमवारीत हे बदल झाल्याचे नमूद केले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतपत्रिकेतील उमेदवारांची क्रमवारी अंतिम करण्यासाठी आम्ही अर्ज क्रमांक चार तयार केला होता. त्यानंतर यादी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. त्यांच्याकडून मतपत्रिकेवरील क्रम अंतिम होतो. गोडसे यांच्यासह काही उमेदवारांनी मूळ नाव, आडनाव यात बदल (मागे-पुढे) करून ते कसे हवे, असे अर्जाद्वारे सांगितले होते. राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार बदल करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे बदल करून उमेदवारांची क्रमवारी सादर झाल्यानंतर आयोगाने मतपत्रिका अंतिम केली.

राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे नाशिकमध्ये तीन उमेदवार आहेत. मतपत्रिकेत त्यांना वरचे स्थान आहे. नंतर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार) यांना स्थान मिळते. तसे ११ उमेदवार आहेत. यानंतर इतर म्हणजे अपक्ष उमेदवारांचा समावेश असतो. नाशिक लोकसभेच्या मतपत्रिकेत १७ अपक्ष उमेदवार आहेत. गोडसेंप्रमाणे अन्य तीन, चार उमेदवारांनी अर्ज देऊन मतपत्रिकेतील क्रमवारीत आपले नाव वर राहील, यासाठी क्लृप्त्या लढविल्याचे दिसत आहे.