लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक मध्यमधून काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, मनसेचे अंकुश पवार, नाशिक पश्चिममधून माकपचे डॉ. डी. एल. कराड, दिंडोरीत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार धनराज महाले यांच्यासह एकूण १४१ जणांनी माघार घेतल्यामुळे अनेक मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. तथापि, देवळाली, चांदवड, नांदगावमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीला तर इगतपुरीत महाविकास आघाडीला अपयश आले.

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याची चार नोव्हेंबर ही अखेरची मुदत होती. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराऐवजी बंडखोरांचे ताबुत शांत करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. अनेक बंडखोरांना माघारीसाठी खुद्द उमेदवार घेऊन कार्यालयात येत होते. निवडणूक शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यातील १५ जागांवर ३३७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यातील एकूण १४१ जणांनी माघार घेतली. नांदगावमध्ये सर्वाधिक १८ तर, नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी दोन उमेदवारांनी माघार घेतली.

आणखी वाचा-आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त

नाशिक मध्यमधून लढण्यावर ठाम राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतविभागणीचा फटका बसू नये म्हणून आपण माघार घेतली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला झुकते माप दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. नाशिक मध्यमधून मनसेचे अंकुश पवार यांनी माघार घेतली. मत विभागणी टाळण्यासाठी मनसेच्या उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून भाजपकडून प्रयत्न सुरू होते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार माघार घेतल्याचे पवार यांनी माध्यमांकडे नमूद केले. नाशिक पश्चिम मतदारसंघात मतविभागणीचा लाभ भाजपला मिळू नये म्हणून माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी माघार घेतली.

नांदगाव मतदारसंघात सर्वाधिक १८ उमेदवारांनी माघार घेतली असली तरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी समीर भुजबळ यांचे आव्हान कायम राहिले. पक्षाचा राजीनामा देऊन ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. दिंडोरी आणि देवळालीप्रमाणे ते पक्ष चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी करीत नसल्याचा टोला भुजबळ यांनी शिंदे गटाला हाणला. शिवसेना शिंदे गटाने महायुतीतील बिघाडी टाळण्यासाठी धडपड केली. त्या अंतर्गत दिंंडोरीतून माजी आमदार धनराज महालेंनी माघार घेतली. मात्र देवळालीत राजश्री अहिरराव यांच्या स्वाक्षरीचे पत्र वेळेत सादर न झाल्याने त्यांची अधिकृत उमेदवारी कायम राहिली. चांदवडमध्ये भाजपमधील सुंदोपसुंदी शमली नाही. गिरीश महाजन यांनी मध्यस्ती करूनही उपयोग झाला नाही. महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात त्यांचे बंधू केदा आहेर यांनी उमेदवारी कायम ठेवली. इगतपुरीत महाविकास आघाडीचे लकी जाधव यांच्यासमोर माजी आमदार निर्मला गावित यांची बंडखोरी आहे.

आणखी वाचा-नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार

मतदारसंघनिहाय माघारी

जिल्ह्यात १५ मतदारसंघात एकूण १४१ उमेदवारांनी माघार घेतली. यात सर्वाधिक १८ जणांनी नांदगावमधून माघार घेतली. मालेगाव मध्य (तीन), मालेगाव बाह्य (१५), बागलाण (नऊ), कळवण (आठ), चांदवड (आठ), येवला (१७), सिन्नर (१०), निफाड (आठ), दिंडोरी (आठ), नाशिक पूर्व (दोन), नाशिक मध्य (११), नाशिक पश्चिम (सात), देवळाली (सहा), इगतपुरी (११) जणांनी माघार घेतली.

Story img Loader