नाशिक – दिंडोरीचे प्रांत अधिकारी नीलेश अपार यांच्याविरुध्द ४० लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यावर त्यांच्याविरुध्द दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढले असून अनेक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात सापडत असतानाही निर्ढावलेले अधिकारी बोध घेण्यास तयार नाहीत. लाचखोरीची कीड प्रशासनाच्या कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत पसरल्याचे दिसून येत आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील एका कंपनीच्या मालकाकडे जागा कायम करण्यासाठी प्रांत अधिकारी अपार यांनी ४० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या तक्रारीची शहानिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आल्यावर बुधवारी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अलिकडील काळात जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, आरोग्य विभागातील हिवताप अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते.