लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरातील भाषणात भिडे यांनी ही विधाने केली होती. त्यामुळे हा गुन्हा अमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

याबाबत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले मंडळाचे अध्यक्ष संतोष गाडेकर यांनी तक्रार दिली होती. भिडे यांच्याकडून महापुरुषांविषयी वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. ३० जुलै रोजी भिडे यांनी अमरावती येथील व्याख्यानात त्याची पुनरावृत्ती केली. महात्मा फुले यांच्याविषयी अतिशय हीन दर्जाची भाषा वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साईबाबा यांच्याविषयी बोलताना त्यांचा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश होता.

हेही वाचा… धुळे : ऊसतोड कामगार पुरविण्याच्या नावाखाली फसवणूक

निरनिराळ्या गटात, समाजात शत्रूत्व वाढविण्याची कृती भिडे यांच्याकडून होत आहे. त्यामुळे या मनोवृत्तीला आळा घालण्यासाठी वादग्रस्त विधानांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी भिडेंविरुध्द गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी गाडेकर यांनी केली. या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी भिडे यांच्याविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. भिडे यांचे वादग्रस्त भाषण अमरावती शहरात झाले होते.

हेही वाचा… यावलमध्ये फर्निचर दुकानांवर कारवाई; वन लाकूड जप्त

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिडे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले होते. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करून भिडे हे तरुणांची माथी फिरवून दिशाभूल करतात, त्यांच्या विधानांनी तेढ निर्माण होऊन दंगली घडू शकतात. त्यामुळे भिडेंविरोधात गुन्हा दाखल करून दंगलीचे बीज रोवणाऱ्या भिडेंना अटक करावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादीने केली होती. ग्रामीण भागात ठाकरे गटासह विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांचा निषेध केला आहे.