सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ गावातील एका उसाच्या शेतीत बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. ऊस तोडणीचे काम सुरु असताना ही दोन बछडे आढळले. या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्धरित्या बछड्यांना बिबट्या मादीकडे स्वाधीन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ या गावातील प्रदीप आढव यांच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरु होतं. तेव्हा ऊसतोडणी कामगारांना शेतात बिबट्याची दोन नवजात बछडे आढळून आली. यानंतर ऊसतोडणीचं काम तातडीने थांबवत, याची माहिती वनविभागास देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने बछड्यांना मातेकडे स्वाधीन करण्यासाठी नियोजन केलं.

पण, पहिल्यांदा बिबट्या मादी केवळ एकाच बछड्याला घेऊन गेली होती. तर, दुसऱ्या बछड्याला आईच्या कुशीत जाण्यासाठी ३० तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यादरम्यान वन विभागाच्या पथकाने बछड्याची सुरक्षित हाताळणी करत, त्याची काळजी घेतली. अखेर ३० तासांच्या प्रतीक्षेनंतर मादी बिबट्याने बछड्याला नेलं आहे. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caught on camera carrying female leopard cubs in sinnar in nashik ssa
First published on: 16-02-2023 at 11:54 IST