नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंना भररस्त्यात लुटलं आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या आईला अशाप्रकारे भररस्त्यात लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

‘टीव्ही ९ मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदी करण्यासाठी घरापासून काही अंतरावर गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. ऐवज हिसकावल्यानंतर आरोपींनी त्वरित घटनास्थळावरून पळ काढला.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
shiv sena leader aditya thackeray hit bjp for favouring gujarat in loksatta loksamvad event
गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिक शहरातील म्हसरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींची अद्याप ओळख पटली नसून घटनेचा तपास सुरू आहे.

मागील काही दिवसात नाशिक शहरात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, शनिवारी सायंकाळी साखळी चोरांनी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईलाच लक्ष्य केलं आहे. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.