मनमाड : मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेला निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. याआधी लासलगाव येथेही या गाडीस शेतकऱ्यांच्या मागणीनुसार थांबा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी क्रमांक ०११५३ देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे आठ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी देवळाली येथून रात्री ०८.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दानापूर येथे पहाटे ५.१५ वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०११५४ दानापूर ते मनमाड शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे १० मार्च ते १४ एप्रिलपर्यंत प्रत्येक सोमवारी दानापूर येथून सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मनमाड येथे सकाळी १०.३० वाजता पोहचेल. देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेला आता लासलगावबरोबरच कसबे सुकेणे स्थानकावर थांबा राहणार आहे. देवळाली ते दानापूर विशेष रेल्वे कसबे सुकेणे येथे रात्री ०९.०५ वाजता येईल आणि प्रस्थान ०९.१० वाजता असेल.