महागाई, अच्छे दिन, केंद्रीय तपास यंत्रणांचे प्रश्न अन् भाजपचा संवाद आटोपता

नाशिक – महागाई केवळ भारतातच नाही तर, संपूर्ण जगात आहे. संपूर्ण विश्व एक गाव झाले आहे. त्यामुळे एखाद्या देशातील घडामोडींचा दुसऱ्यावर परिणाम होतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी दर अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. आपल्या शेजारील देशांची स्थिती बघितल्यावर वास्तव लक्षात येईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केले.

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर, विजयवर्गीय यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. नंतर महागाई, अच्छे दिन, विरोधकांच्या मागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर मात्र त्यांनी अन्य कार्यक्रमास जाण्याचे कारण देऊन संवाद आटोपता घेतला.

Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
onion prices Nashik, falling onion prices,
उपाय न योजल्यास कांदा अधिक घसरण्याची भीती, लासलगाव समितीचे केंद्रीय अर्थमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना साकडे
Loksatta viva Winter Foods Food Culture by Region Maharashtra
सफरनामा: थंडीतली खाद्यामैफील!
Pradhan Mantri Poshanshakti Nirman Yojana ,
केळ्यांसाठी शाळांना मिळणार अनुदान… काय करावे लागणार?
Maharashtra State Cabinet Expansion Satara district gets maximum ministerial posts
मराठ्यांना प्राधान्य… सातारा जिल्ह्यास सर्वाधिक मंत्रिपदे… मुंबई, नाशिकची बोळवण… मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार?
Paddy Growers, Gondia District, Paddy, 235 crore stuck,
२३५ कोटी शासनाकडे अडकले; गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांची कोंडी

हेही वाचा >>> तापी बुऱ्हाई सिंचन योजना २५ वर्षांपासून पूर्णतेच्या प्रतिक्षेत – जलसंपदाचे पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष

मोदी सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरचे दर ४०० रुपयांवरून १२०० रुपयांवर पोहोचले. इंधनासह महागाई वाढत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हा जागतिक स्थितीचा परिपाक असल्याचा दावा केला. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कांदा, द्राक्षांच्या निर्यातीला चालना देण्यात आली. देशातील ८० कोटी लोकांना अन्नधान्य नि:शुल्क मिळत असून त्यांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे. गरीब लोक स्वत:च्या घरात राहण्याचा विचार करू शकत नव्हते. आज तब्बल चार कोटी लोकांना घर मिळाले असून हे अच्छे दिन नाहीत का, असा प्रश्न त्यांनी केला.

विरोधकांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असल्याचा आक्षेप त्यांनी खोडून काढला. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांना घाबरावेच लागणार आहे. कुणाला ती कारवाई चुकीची वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. ठाकरे गटासह अनेक मित्रपक्ष भाजपला सोडून गेले. हे पक्ष खुर्चीचे राजकारण करतात, आम्ही देशासाठी राजकारण करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात भारताची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोधात असूनही परदेशात देशाविषयी मांडलेल्या भूमिकेचा दाखला त्यांनी दिला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिवसभर उत्तरे देण्याची तयारी विजयवर्गीय यांनी दर्शविली होती. तथापि, प्रश्नांचा रोख पाहिल्यानंतर त्यांच्यासह भाजपच्या मंडळींनी काही वेळात संवाद आटोपता घेतला.

तुलनात्मक लेखाजोखा मांडणी काँग्रेस सरकारच्या काळात देशात निराशेचे वातावरण होते. राजकीय इच्छाशक्तीअभावी निर्णय घेतले जात नव्हते. मोदी सरकारच्या नऊ वर्षात संपूर्ण चित्र बदलले. स्वच्छ मनाने सरकार धोरणे आखून प्रभावी अमलबजावणी करीत आहे. भ्रष्टाचार नसल्याने अर्थव्यवस्थेचा विकास झाला. आता संपूर्ण जगात भारताला सन्मान मिळत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अमेरिकेलाही भारताकडून आस आहे. जागतिक मंदीचा देशावर फारसा परिणाम होणार नाही. सैन्याचे मनोधैर्य चांगले आहे. काँग्रेसच्या काळात प्रतिदिन नऊ किलोमीटर नवे रस्ते निर्मितीची क्षमता आज ३७ किलोमीटरवर गेली आहे. विमानतळांची संख्या दुपटीने वाढली. हवाई प्रवास स्वस्त झाला. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. मोफत वैद्यकीय उपचारासाठी ५० कोटी जनतेचा आरोग्य विमा काढण्यात आला. त्यातील पाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले.

Story img Loader