रामजन्मभूमी आंदोलनात हिंदुहृदयसम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील भाजपचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य हे व्यक्तिगत असून ती पक्षाची भूमिका नाही. ज्यावेळी रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते, त्यावेळी त्यात सर्व सहभागी कारसेवकांची प्रभू रामचंद्रांचे मंदिर व्हायला हवे, अशी भूमिका होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना कार्यकर्त्यांचा एकच विचार होता, तो म्हणजे प्रभू रामचंद्रांचे मंदिर निर्माण होण्याचा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली, तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनीचे होते, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली.

हेही वाचा >>>जळगाव: जिल्हा बँकेत अध्यक्षांनाच स्वपक्षातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

संघटनात्मक दौर्‍यानिमित्त जळगावात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व्हायला हवे, यासाठी देशभरातून कारसेवक आले होते. रामजन्मभूमीचे आंदोलन हा एक विचार होता, आंदोलन होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या कारसेवकांच्या अयोध्येतील आंदोलनाला समर्थन होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्यकर्ते तेथे नव्हते, असे म्हणणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचीही त्यात मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची ती व्यक्तिगत भूमिका आहे, ती पक्षाची नाही. रामजन्मभूमीच्या आंदोलनात असलेले कारसेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले होते, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य खोडून काढले आहे.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ उपस्थित होते.