लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : दसऱ्याच्या दिवशी रामकुंडावर होणारा रावण दहन कार्यक्रम आणि शहरातील देवी मूर्ती विर्सजन निमित्ताने परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दसऱ्यानिमित्त येथील चतुर्संप्रदाय आखाडा यांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रावण दहनापूर्वी राम लक्ष्मण सेनेची मिरवणूक आखाडाच्या वतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरू होईल.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

मालेगाव स्टॅंड-पंचवटी कारंजा-मालवीय चौक-शिवाजी चौक-सीतागुंफा-श्री काळाराम मंदिर-सरदार चौक-साईबाबा मंदिरमार्गे रामकुंडाजवळील वाहनतळ मैदान येथे मिरवणूक येईल. या ठिकाणी राम व रावण युध्द होऊन रात्री १० वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरातील नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळांकडून रामकुंडावर देवी मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असल्याने न मिरवणुकीने देवी मूर्ती वाहनांमधून आणल्या जातात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत

या अनुषंगाने शनिवारी दुपारी तीनपासून रात्री १० पर्यंत मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंड-सरदार चौक ते गाडगे महाराज पूल तसेच गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक-रामकुंड ते मालेगाव स्टँण्डकडे जा-ये करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गणेशवाडी-काट्यामारूती चौकी-निमाणी बस स्थानक- पंचवटी कारंजा यामार्गे इतरत्र ये-जा करावी, वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.