नाशिक – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणूक निमित्ताने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गुरुवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.शहरात अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक महात्मा फुले पोलीस चौकी-हॉटेल शिरसाठ-चौक मंडई-हाजी टीपासून वेगवेगळ्या मार्गाने जाऊन मुख्य टपाल कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Money Laundering Case Against Ex MP : जळगाव : माजी आमदार जैन पिता-पुत्र अडचणीत; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी खटला

मिरवणुकीमुळे होणारी गर्दी पाहता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच अण्णा भाऊ साठे पुतळा ते कालिदास कलामंदिर , शिवसेना भवन या दोन्ही मार्गावर वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत पंचवटी येथील निमाणी बस स्थानक तसेच पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बस या पंचवटी आगारातून सुटतील. जुना आडगाव नाका-संतोष टी पॉईंट -द्वारकामार्गे इतरत्र जातील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस आणि इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल आणि पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिकसह इतर ठिकाणी जातील. द्वारका सर्कलकडून नाशिक शहरात येणाऱ्या बस या सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, सीबीएसमार्गे इतरत्र जातील. वाहनचालकांसह नागरिकांनी याची नोंद घेत सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.