नाशिक – अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवतील. ते आमचे कर्णधार असल्याने मधेच शस्त्र टाकणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भुजबळ यांनी, महायुतीला आगामी निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर एकमेकांवर टीका करू नका, असा सल्ला दिला. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. निवडणुकीत प्रचारासाठी आम्हांला जे नेते हवे आहेत, त्यांना आम्ही बोलवणार आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
Sharad Pawar On Rohit Pawar Rohit Patil
Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण

हेही वाचा >>>मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार

लाडकी बहीण योजनेसाठी अन्य योजनांचे पैसे अडवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. वास्तविक काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असतांनाही काही योजनांचे पैसे दोन-तीन वर्ष रखडले होते. सरकारचा अग्रक्रम ठरलेला असतो. सरकार सर्वांचे पैसे देणार. जसे पैसे जमा होतील, तसे त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील. रस्त्यांवरील खड्डे हा प्रत्येकाच्या वेदनेचा विषय असल्याने त्यावरुन नाशिकमध्ये आंदोलनांच्या माध्यमातून लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>नाशिक : शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या

राज्यपालांविषयी आदर

राज्यपाल सोमवारी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितर्क करण्यात येऊ लागल्याने भुजबळ यांनी, विविध कामांमुळे राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना हजर राहता आले नसल्याचे सांगितले. आचारसंहिता कधीही लागु होण्याची शक्यता असल्याने विकासकामांचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. राज्यपालांविषयी आदर आहे. परंतु, अनेक ठिकाणी जाणे आवश्यक होते, असे भुजबळ यांनी सांगितले.

Story img Loader