नाशिक – राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत काम करावेच लागेल. फाईलींवर स्वाक्षरी करावी लागेल, अशी अपरिहार्यता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य पक्षातील काही नेते भुजबळांचा राजीनामा हे एक नाटक आहे, ते सरकारी लाभ घेत असल्याची टीका करत आहेत. यावर भुजबळ यांनी, कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या, आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे असल्याचा पुनरुच्चार केला. आपण आपल्या वाहनातून फिरत असून कार्यकर्त्यांच्या खर्चातून जाहीर सभा होत असल्याचा दावा त्यांनी केला. मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचे, कुणाला काढायचे, याचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री घेतात. त्यानुसार राज्यपालांना कळवतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांच्या विधानाची भुजबळांनी पुन्हा खिल्ली उडवली. जरांगे यांचा एकेरी उल्लेख करुन अर्थसंकल्पातून आरक्षण मागत आहे. आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येईल, त्यातून आरक्षण घ्या, असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला.

हेही वाचा – “माझ्या नॅपकिनमध्ये जादू आहे, ती…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला भरत गोगावलेंचं उत्तर

हेही वाचा – “ओबीसी-मराठा वाद सरकारनिर्मित; जनाची नाही तर मनाची लाज बाळगा,” नाना पटोले यांचा घणाघात

अंबडच्या सभेला जाण्याआधी आपण राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला होता. सभेला जाताना त्याबाबत वाच्यता करू नका, असा निरोप दिला गेला. नंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपणास बोलावून घेतले. सर्वांनी ओबीसींबाबत मत मांडायला आमचा विरोध नाही, शांतपणे मत मांडावे, राजीनाम्याची वाच्यता करू नये, असे सांगितले होते. त्यामुळे अडीच महिने आपण वाच्यता केली नाही. परंतु, नंतर एक जण बोलला की, कंबरेत लाथा घाला आणि बाहेर काढा. त्यानंतर राजीनाम्याची वाच्यता केल्याचे त्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal claim to work as a minister as his resignation was not approved ssb
Show comments