विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी भाजपाकडून निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवारांना जाणता राजा का म्हणू नये? असा सवाल करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – VIDEO: “अरे एवढी वर्षे राजकारण करूनही बारामती शरद पवारांचं होऊ शकलं नाही, असं कधी…”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

shrinivas pawar and ajit pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांचा शरद पवारांवर घर फोडल्याचा आरोप? थोरले भाऊ म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
nitin gadkari
Nitin Gadkari : VIDEO : “राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांच्या तिकीटाची चिंता, पण आम्हाला…”; नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
18 against former corporator MLA Anna Bansode Pimpri Assembly Constituency
पिंपरी विधानसभा: १८ माजी नगरसेवक विरोधात गेल्यास अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय…
riteish and genelia deshmukh
दिवाळी पार्टीत रितेश देशमुखच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, बायकोसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “Green Flag…”

काय म्हणाले छगन भुजबळ?

“अजित पवार यांनी कधीही संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. त्यांचे विधान चुकीचं असतं, तर विधानसभेतच भाजपाने आक्षेप घ्यायला हवा होता, मात्र, तसं झालं नाही. काही दिवसांपूर्वी राज्यपालांसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे या मुद्यावरून लक्ष दूर करण्यासाठी अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच संभाजीराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं म्हणून त्यांना स्वराज्यरक्षक म्हटलं जातं. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – लोकल ट्रेनमधून ओढत बेदम मारहाण केल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, शरद पवारांना जाणता राजा म्हटल्याने शिवाजी महाजारांचा अपमान होतो, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझं समर्थन आहे. कारण जो राज्यकर्ता असतो, त्याला पूर्वीच्या भाषेत जाणता राजा म्हटले जात होते. शरद पवारांनी सरकारच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, मुंबई, नाशिकमध्ये अनेक उद्योग शरद पवार यांनी आणले. शिक्षण क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, त्यांनी मोठं काम केलं आहे. त्यांच्यामुळेच आज महिलांना आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणतात. जनतेच्या समस्यांशी एकरूप होऊन, जो प्रश्न मार्गी लावतो, तो जाणता राजा असतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.