नाशिक – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर प्रथमच शहरात आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईहून निघाल्यापासून भुजबळ फार्म या निवासस्थानापर्यंत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. शरद पवार हे येवला दौऱ्यावर असताना भुजबळांच्या समर्थनार्थ झालेले शक्ती प्रदर्शन चर्चेचा विषय ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “मी इथे माफी मागण्यासाठी आलोय, कारण…”, येवल्यातल्या सभेत बोलताना शरद पवार भावनिक

मंत्री झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर येण्यासाठी भुजबळ यांनी शनिवार निवडला. नेमक्या या दिवशी येवला येथे शरद पवार यांच्या सभेचे नियोजन होते. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मुंबईहून निघाल्यापासून ठिकठिकाणी भुजबळ यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. इगतपुरी येथे दाखल झाले असतांना कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, मी नाशिककर जनतेचे मनापासुन आभारी आहे. आज मी मुंबईहून निघालो तेव्हा ठइकठिकाणी कार्यकर्ते, माझे बांधव आणि भगिनी मोठअया संअयेने उपस्थित होते. या वरून लक्षात येते की, आमचा अजित दादांनी घेतलेला निर्णय जनतेला मान्य आहे. पवार साहेबांचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या सोबत होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी जाहिर सभेसाठी येवल्याची निवड केली.

हेही वाचा >>> “महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या खंडोजी खोपडेंचा नाही, तर…”, अमोल कोल्हे कडाडले

दरम्यान, पाथर्डी फाटा परिसरात त्यांचे वाहन आले असता कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत झाले. उड्डाणपुलावरून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच क्रेनच्या मदतीने त्यांना भव्य हार घालण्यात आला. महिलांनी त्यांचे औंक्षण करत त्यांच्या उदंड आयुष्या विषयी प्रार्थना केली. या वेळी कॅबिनेट मंत्री भुजबळ यांच्या वाहनाचा ताफा, त्यांना पाहण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी, हा सोहळा पाहण्यासाठी पाथर्डी फाटा तसेच उड्डाणपुलावर लोकांची झालेली गर्दी या मुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. स्वागत सोहळ्यानंतर भुजबळ भुजबळ फार्म हाऊसकडे येत असतांना चौका चौकात फलकबाजी तसेच कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ, फटाक्यांच्या आतीशबाजीत स्वागत करण्यात आले.