घरात झोका खेळत असताना अचानक दोरीचा गळफास लागून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनीत घडली. निखील सैंदाणे (अश्विनीनगर, म्हाडा कॉलनी) असे मृत बालकाचे नाव आहे. निखील सायंकाळी आपल्या घरात छताच्या हुकला बांधलेल्या झोक्यावर खेळत होता. यावेळी सुती दोरी अडकल्याने त्याला गळफास लागला. ही बाब लक्षात येताच आई दीपाली सैंदाणे यांनी दोरी सोडून खाली उतरविले. तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक: झोक्याचा गळफास लागून बालकाचा मृत्यू
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 29-07-2023 at 17:03 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child death due to accidentally hanging at home zws