लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : अंगणातील माती खातो म्हणून दोन वर्षाच्या बालकास ११ वर्षाच्या मावसभावाने मारहाण केली. मारहाणीत बालक खडीवर पडल्याने जोरात रडू लागला. त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात मावसभावाकडून गळा दाबला गेल्याने बालकाचा मृत्यू झाला.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

आडगाव शिवारातील लेंडीनाला भागात नऊ ऑक्टोबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. शवविच्छेदन अहवाल आणि मृत बालकाच्या अल्पवयीन भावाकडे केलेल्या चौकशीतून हे उघड झाल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत वीर बोके (दोन वर्ष) या बालकाचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान

वीर आणि अल्पवयीन मावसभाऊ लेंडीनाला भागात शेजारी शेजारी वास्तव्यास आहेत. नऊ ऑक्टोबरला वीर हा दुपारी आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असताना माती खात होता. हे पाहून अल्पवयीन मावसभावाने माती खाण्यापासून रोखण्यासाठी त्याला बुक्क्यांनी मारहाण केली. यात खडीवर पडल्याने वीर यास लागल्याने तो जोरजोरात रडू लागला. त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात मावसभावाकडून वीरचा गळा दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ११ वर्षीय मावसभावाविरुध्द भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मद्य, गुटख्यासह ६४ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त – ग्रामीण पोलिसांची कामगिरी

दरम्यान, अल्पवयीन संशयितांवर कारवाई करताना वयोगटानुसार काही निकष आहेत. हा संशयित मुलगा सात ते १२ वयोगटात मोडतो. तपास यंत्रणा संशयिताच्या वयाचे पुरावे संकलित करीत आहे. कायद्यातील तरतुदीनुसार संशयितास बालकल्याण समितीसमोर हजर केले जाईल, असे सहायक पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम यांनी सांगितले.