नाशिक – मालेगाव तालुक्यातील दसाणे येथे १४ वर्षाच्या मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी मालेगांव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दसाणे येथे राहणारा सोमनाथ देवरे हा मुलगा शेतात खेळत असताना त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला सर्पदंश झाला. हा प्रकार त्याचे काका समाधान ठाकरे यांच्या लक्षात आला. त्यांनी त्वरीत सोमनाथ यास मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. पावसाळ्यात साप बाहेर पडत असतात. त्यामुळे या दिवसात सर्पदंशाच्या अनेक घटना घडत असतात. प्रामुख्याने या दिवसात शेतकऱ्यांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader