चोपडा येथील साखर कारखाना निवडणूकप्रकरणी सर्वपक्षीय उमेदवारांची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे बारा जागांसाठी निवडणूक अटळ आहे. बारा फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चोपडा येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, माघारीअंती नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शेतकरी कृती समिती असे सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले आहे. माघारीच्या दिवशी काही उमेदवारांचे वेळेअभावी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे राहून गेल्याने अशा एकूण अकरा उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल करून आम्हाला निवडणूक लढवायची नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन दोनसदस्यीय न्यायाधीशांच्या पीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा – छत्तीसगढमधील चर्चवर हल्ल्यांच्या निषेधार्थ धुळ्यात मूक मोर्चा
चोपडा साखर कारखाना बारामती अॅग्रोला भाडेतत्त्वावर दिल्यानंतर यंदा पहिल्यांदा निवडणूक लागली. मुळातच निवडणुकीची सुरुवातच वादाने झाल्याने आरोप-प्रत्यारोप होऊन काही उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेतल्याने निवडणूक औरंगाबाद खंडपीठात जाऊन पोहोचली. त्यानंतर उमेदवारी माघारीच्या दिवशी सकाळी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार व नेत्यांच्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल ठरले. त्यानुसार ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील आदी नेत्यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले. त्यामुळे चहार्डी, गोरगावले बुद्रुक व अडावद या तीन ऊस उत्पादक गटांत नऊ उमेदवार बिनविरोध झाले, तर काही उमेदवार माघारीच्या दिवशी दुपारी तीनपर्यंत चोपडा येथे वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे बारा जागा बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. यासाठी संबंधित उमेदवारांनी आपल्याला निवडणूक लढवायची नाही, परंतु वेळेअभावी माघार घेता आली नाही. मात्र, कारखाना निवडणूक खर्चात जाऊ नये म्हणून आमचे माघारीचे अर्ज व प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरून नामंजूर करावेत किंवा आमची माघार गृहीत धरावी, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
या याचिकेवर न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी उमेदवारांची याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अजित काळे यांनी काम पाहिले. आधीच माघारीसाठी अपक्ष उमेदवार प्रकाश रजाळे यांनी अनेकांचे प्रयत्न हाणून पाडत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. दुसरीकडे अकरा उमेदवारांची माघार याचिका खंडपीठाने फेटाळल्याने आता साखर कारखान्याची निवडणूक अटळ बनली असून, त्यासाठी बारा फेब्रुवारी रोजी बारा जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.