घरगुती उत्सवासाठी ख्रिसमस ट्रीला विशेष मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ख्रिसमसनिमित्त ‘ख्रिसमस माय लव्ह गेव्ह टू मी अ ड्राय, ब्राऊस ख्रिसमस टी’ असे गीतांचे सूर आवळत शहर परिसरात नाताळनिमित्त खरेदीला उधाण आले आहे. शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये नाताळ साजरा होत असल्याने बच्चे कंपनीसह पालकही खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्लास्टिक बंदीचा फटका या उत्सवाला बसला असला तरी ‘ख्रिसमस झाड’ आणि अन्य सजावटीचे पर्यावरणपूरक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बच्चे कंपनीला खुश करण्यासाठी मोठय़ांकडून सांताक्लोजच्या पेहेरावाला विशेष मागणी आहे.  सजावटीसह खवय्येगिरी करणाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत. नाताळचे मुख्य आकर्षण असणाऱ्या ‘सांताक्लोज’ तसेच ‘ख्रिसमस ट्री’ च्या वेगवेगळ्या प्रतिकृती ३०० रुपयांपासून पुढे विक्रीसाठी आहे. घरगुती उत्सवासाठी ख्रिसमस ट्रीला विशेष मागणी असून दुकानांमध्ये, वेगवेगळ्या शो रुममध्ये मोठय़ा आकाराच्या सांताक्लोज प्रतिकृ तीस तसेच बाहुल्याला पसंती मिळत आहे. यंदा ख्रिसमस ट्री आठ ते १० फुट उंचीचे आले असून ते बर्फ पडत असल्याचा आभास निर्माण करत आहे. तसेच हे झाड सजविण्यासाठी आकर्षक रंगबेरंगी घंटा, चांदण्या, चेंडु, विद्युत रोषणाई, रंगीत फुलांच्या माळा, तोरण उपलब्ध आहे. चर्चसह काही ठिकाणी घरातही ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात येत असल्याने देखावा सजावटीच्या विविध प्रतिकृती बाजारात आहेत. उत्सव काळात आप्तस्वकियांना भेट देण्यासाठी अनेक प्रकारच्या सुवासिक मेणबत्त्या, चॉकलेटस, चॉकलेट बुके, शुभेच्छा पत्र यांची चलती आहे. ग्राहकांच्या खिशाचा अंदाज घेता २०० रुपयांपासून पुढे अशी त्यांची विक्री होत असल्याचे विक्रेते गायकवाड यांनी सांगितले. दुसरीकडे, लहानग्यांकडून सांताक्लोजच्या टोपीला विशेष मागणी आहे. पंचवीसपासून ते ७० रुपयांपर्यंत या टोपीची किंमत आहे. हँण्डबँड, कॅण्डीबॉक्स, सांताक्लोजच्या पिशव्या अशा वस्तु आकर्षित करीत आहेत. याशिवाय केक, पेस्ट्री, चॉकलेटचे विविध पर्याय देतांना विक्रेत्यांनी यावर आकर्षक सवलती दिल्या आहेत.

प्लास्टिक बंदीचा सजावटीच्या साहित्यावर परिणाम झाला असून प्लास्टिकऐवजी फायबर, कागद, लाकूड यांपासून तयार करण्यात आलेले साहित्य विक्रीसाठी आले आहेत. हाताने तयार केलेला कागद आणि लाकडाचा भुसा यांपासून ख्रिसमस ट्री तयार केले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही असे विक्रेते अमन जैन यांनी सांगितले.