लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहराची स्वच्छता आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी या दोन विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी म्हटले आहे. तीन महिन्यांपासून रिक्त असणाऱ्या आयुक्त पदावर डॉ. करंजकर यांची नियुक्ती झाली. कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले असताना शासनाने त्यांची साखर आयुक्तपदी बदली केली होती. तेव्हापासून म्हणजे जवळपास तीन महिन्यांपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविला गेला. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने अनेक महत्वाचे विषय प्रलंबित राहिल्याचा सूर उमटत होता. शिवसेना, भाजपच्या मंत्र्यांमधील सुप्त संघर्षातून पूर्णवेळ आयुक्त नियुक्ती रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर शासनाने राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. करंजकर यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. मूळचे उस्मानाबादचे असणारे डॉ. करंजकर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००९ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी कृषी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, ठाणे महानगर परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक, अपर जिल्हाधिकारी, मुद्रांक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक आदी पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

आणखी वाचा-Video: समृध्दी महामार्गावर अमित ठाकरे यांचे वाहन रोखल्याने टोल नाक्याची तोडफोड

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. करंजकर यांनी स्वच्छता अभियानात नाशिकचा क्रमांक बराच घसरल्याकडे लक्ष वेधले. आगामी कुंभमेळ्यात शहरात मोठ्या संख्येने भाविक येतील. पाहुणे येणार असतील तर आपण घर आवरतो, स्वच्छ ठेवतो. त्याच धर्तीवर, नाशिक शहर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष दिले जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी महत्वाची आहे. त्या अनुषंगाने नियोजन, प्रस्तावित वळण रस्ते प्रकल्पांना गती देऊन ते जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता कर, पाणीपट्टीबरोबर अन्य स्त्रोत निर्माण करण्यावर लक्ष दिले जाईल. पूर्णवेळ आयुक्त नसतानाच्या काळात मंजूर झालेल्या फाईल्सची पडताळणी केली जाईल. काही अनियमितता आढळल्यास त्या पूर्वस्थितीत आणल्या जातील, असे सांगितले.