लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणुन संदिप कर्णिक यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात पदभार स्विकारला. या वेळी नाशिक शहर पोलीसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची शहर परिसरातून अवघ्या दहा महिन्यात बदली करण्यात आली. नवे पोलीस आयुक्त म्हणून संदिप कर्णिक यांची नियुक्ती झाली. कर्णिक यांनी पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेण्याआधी ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेतले. पोलीस आयुक्तालयाच्या आवारात पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पोलीसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

आणखी वाचा-नाशिक : …अखेर सिटी लिंक बस सेवा पूर्ववत सुरू

दरम्यान, तत्कालीन पोलीस आयुक्त शिंदे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला. या वेळी बोलतांना कर्णिक यांनी सांगितले, पुण्या नंतर नाशिकला काम करता येत आहे. याचा आनंद वाटतो. नाशिककरांच्या गरजा लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देणार असून पोलीस व नागरीकांमध्ये संवाद वाढावा यासाठी काम करेल. दरम्यान, पोलिस आयुक्त कर्णिक यांच्या समोर शहरातील वाढती गुन्हेगार, अंमली पदार्थ तस्करी यासह अन्य आवाहने आहेत. या आवाहानांवर ते कशी मात करतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.