नाशिक : आश्वासन देऊनही ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहकांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे शुक्रवारी महापालिकेची सिटीलिंक बस सेवा ठप्प होऊन प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. ही बस सेवा वारंवार ठप्प होत असल्याने प्रवासी वैतागले आहेत.

महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. ते पुरविण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे, त्याने मे आणि जून अशा दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्याने मागील महिन्यात वाहकांनी सलग दोन दिवस संप पुकारला होता. त्यावेळी मनपा, सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार कंपनी याच्यात बैठक होऊन वाहकांचे वेतन दोन दिवसात देण्याचे निश्चित झाले होते. आश्वासन देऊनही ठेकेदार कंपनीने वेतन दिले नाही. त्यामुळे सुमारे ५०० वाहकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, शुक्रवारी सकाळपासून सिटीलिंकच्या २०० हून अधिक बस तपोवन आणि नाशिकरोड आगारात उभ्या आहेत.

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
पुणे : ‘ती बस’ पुन्हा सुरू होणार; पण आता शुल्क लागणार
Nashik municipal corporation complaints news in marathi
नाशिक महापालिकेवर तक्रारींचा भडीमार;अतिक्रमणांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी
Thackeray group on streets against bus fare hike protests at various places in nashik
बस भाडेवाढीविरोधात ठाकरे गट रस्त्यावर, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
Finance Minister approves purchase of 25000 privately owned st buses in five years
गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता

हेही वाचा… नाशिक: खड्डे दुरुस्तीला १५ दिवसांची मुदत, अन्यथा प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात

हेही वाचा… पळसे शिवारात बिबट्याचा वावर

सिटीलिंकच्या सुमारे २५० बसेस शहर व ग्रामीण भागात धावतात. हजारो पासधारक विद्यार्थी सिटीलिंकने प्रवास करतात. सकाळी विविध थांब्यांवर त्यांना ताटकळत रहावे लागले. बससेवा बंद असल्याची माहिती समजल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. काही पासधारक विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. नोकरदार वर्गाचे हाल होत आहे.

Story img Loader