शनिवारपासून दिवाळीला प्रारंभ होत असून खरेदी, गावी जाण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळी काळात सुट्टीच्या दिवशीही मनपाच्या सिटीलिंकच्या बसेस पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतला आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सध्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावी जातात.
हेही वाचा >>>आलिया भोगासी…. ; मविप्रतील गणवेश बदलाने शिक्षिकांसह कार्यकारिणीला मनस्ताप
सिटीलिंकच्यावतीने शासकीय सुट्टी, सार्वजनिक सुट्टीच्या (रविवार ) दिवशी प्रवासी प्रतिसाद कमी मिळत असल्याने बस फेर्यांमध्ये कपात करण्यात येते. मात्र शनिवारपासून पासून दिवाळी सुरू होत असल्याने सुट्टी असली तरी बसेस पूर्ण क्षमतेने चालविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. २३ आणि ३० ऑक्टोबर रोजी रविवार असला तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारच्या दिवशी देखील सर्व बसेस सुरू असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.