शिवसेनेतील फाटाफुटीनंतर म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून पक्षातील दोन्ही गटातील वाद उफाळून आला आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे हे अकार्यक्षम ठरल्याचा ठपका ठेवत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबन घोलप यांनी त्यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. तथापि, त्यांना असा कुठलाही अधिकार नसून कार्यकारिणीने तातडीने ठराव करीत तिदमे हेच अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नाशिक : मातोश्री वारीतून एकनिष्ठ-फुटीरांची शिरगणती ; पडझड रोखण्यासाठी शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवकांच्या दारी

घोलप यांच्या निर्णयाला शिंदे गटाचे आव्हान

सेनेला सोडचिठ्ठी देऊन तिदमे हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने तातडीने त्यांना म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून हटविण्याची कारवाई केली होती. या पदावर ते अकार्यक्षम ठरले असून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आक्षेप नोंदवत ही कारवाई केली गेली. तूर्तास संघटनेचे कामकाज आपणच बघणार असल्याचे घोलप यांनी म्हटले होते. परंतु, त्यांच्या या निर्णयाला शिंदे गटाने आव्हान दिले.

हेही वाचा- नाशिक : कांद्याची घसरण रोखण्यासाठी उपायांची गरज – छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तिमदे हेच अध्यक्षपदी कायम

संघटनेचा अध्यक्ष बदलाचा, निवडण्याचा वा कारवाईचा संंपूर्ण अधिकार कार्यकारिणीचा आहे. संघटनेच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक झाली. तिदमे हेच आजही अध्यक्ष असल्याचा ठराव करण्यात आला. घोलप यांना कार्यकारिणीने अध्यक्ष म्हणून निवडलेले नाही. त्यांना स्वत:ला स्वत:चे पद घोषित करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तिदमे हेच अध्यक्ष राहतील, असा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाची माहिती कामगार उपायुक्त व मनपा आयुक्तांना देण्याचे निश्चित झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between shivsena and shinde group over nashik municipal employee kamgar sena president post dpj