किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटातील हाणामारीत झाले. शहरातील वरखेडी रस्त्यावर झालेल्या या हाणामारीत कोयता, गज, बेसबॉलची बॅट, दगड आणि अन्य शस्रे वापरण्यात आली. एका गटाकडून चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. आझाद नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा- कांदा गडगडल्याने शेतकरी आक्रमक; क्विंटलला ५०० रुपयांचा दर, नाशिकमध्ये ‘रास्ता रोको’

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

प्रतीक बडगुजर उर्फ (मल्या) याचा वरखेडी रस्त्यावरच मिरची कांडप व्यवसाय आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान प्रतीक यास आकाश परदेशी याचा भ्रमणध्वनी आला. तुला जिवंत सोडणार नाही, असे आकाशने धमकावित शिवीगाळ केली. आकाशने दारूच्या नशेत धमकाविले असेल असे वाटल्याने प्रतिकने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु, थोड्या वेळात प्रतिकच्या घरावर दगडफेक सुरू झाली. यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते. काही विचारण्याच्या आत हल्लेखोरांनी प्रतिकच्या चारचाकीवर आणि दुचाकीवर दगड आणि गजचा वापर करून हल्ला चढविला. प्रतीक घराबाहेर येताच आकाश परदेशी, निखील बडगुजर, दिगंबर माळी यांनी बेसबॉलच्या बॅटने मारहाण केली.

हेही वाचा- नाशिक : यशवंतराव चव्हाणा मुक्त विद्यापीठाचा उद्या दीक्षांत सोहळा; दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी मिळणार

सागरच्या हातात कोयता होता. दर्शन चौधरी, दर्शन माळी, प्रथमेश काळे यांच्या हातात हाॅकीस्टीक होती. नंदु परदेशी, शिवम परदेशी यांनी गज आणला होता. यांच्यासह अजून सात ते आठ जण होते. शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देवून हल्लेखोर निघून गेल्याचे प्रतिकने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, कुंदन शिंदेने दिलेल्या तक्रारीनुसार तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजेला वरखेडी रस्त्यानेघरी जात असतांना भोले बाबा मंदिराजवळ रिंकू बडगुजर, मल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे,भुषण माळी, हर्षल महाचार्य यांनी आकाश परदेशीसोबत का राहतो, असे विचारत शिवीगाळ केली. प्रतीक, कुंदनने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे

Story img Loader