नाशिक: इयत्ता ११ वी लांबलेली प्रवेश प्रक्रिया अजूनही चालुच असून इयत्ता १० वीच्या पुनर्परीक्षार्थींना प्रवेश घेण्यासाठी विशेष फेरी शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून गुरूवारपासून या फेरीला सुरुवात झाली आहे. ही फेरी २५ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा ११ वी प्रवेश प्रक्रियेत नऊ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी प्रवेश फेऱ्या होत असताना नुकताच इयत्ता १० वी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश घेता यावा तसेच आधी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी सतत विशेष फेरी घेण्यात येणार आहे. निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी १० वाजता घोषित केली जाणार आहे. यासाठी दररोज नव्याने अर्ज करावा लागेल.

हेही वाचा… एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

संध्याकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ या वेळेत दैनंदिन गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्याने पसंती दर्शविलेल्या प्रत्येक विद्यालयाच्या प्रतीक्षा यादीमधील त्याचे स्थान विद्यार्थ्यांस पाहता येईल. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पाहता येतील. विद्यालयात रिक्त असलेल्या जागेप्रमाणे विद्यार्थी त्या विद्यालयाच्या निवड यादीत समाविष्ट होतील. अर्ज केलेले उर्वरित विद्यार्थी प्रतिक्षा यादीत जातील. दररोज पसंती, दररोज सुधारित गुणवत्ता यादी हे या फेरीचे वैशिष्ट्य आहे.

सतत फेरी अंतर्गत २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येईल. तसेत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश घेता येणार आहे. सायंकाळी सहापर्यंत अतिरिक्त वेळ प्रवेशासाठी देण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 11 protracted admission a special round has been organized to admit the re examiners of class 10 and this round has started from thursday nashik dvr