नाशिक : बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे. संस्थेकडून किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू असल्याची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी थेट साल्हेर गाठून सर्व युवक-युवतींचे विशेष अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी गुजरातच्या सुरत येथील’वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेकडून विशेष योगदान दिले जात आहे. त्यानुसार संस्थेचे सदस्य असलेल्या युवक-युवतींकडून काही महिन्यांपासून दर महिन्याला साल्हेर किल्ल्यावर येऊन स्वच्छता मोहीम केली जाते. गुजरातमधील विविध आस्थापनांमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले हे सदस्य नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवत आहेत. गिर्यारोहणासाठी येणाऱ्या या युवक आणि युवतींकडून किल्ल्यावर स्वच्छता केली जाते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…नाशिक महानगरपालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे ; भाजप आमदाराचा संताप

विशेषत्वाने प्लास्टिकचा कचरा गोळा करून तो गडाखाली आणण्यात येतो. नुकतीच ही मोहीम राबवण्यात आली. त्याबाबत आमदार बोरसे यांना स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळताच या उपक्रमाची दखल घेत त्यांनी थेट साल्हेर गाठले. यावेळी आमदार बोरसे यांनी सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांच्याकडून संस्थेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

राज्य शासनाच्या माध्यमातून १५४ कोटी रुपये खर्चाची शिवसृष्टी साल्हेर परिसरात उभारण्याचे काम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत. या कामासाठी आपल्यासारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. त्यावेळी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आमदार बोरसे यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे वैभव नायक, किंजल नायक, आनंद राघवसिंग, ब्रिजेश माची, काजल महाला, पिनल पटेल, संगीता भोये, युवराज भोये, अनिल बहिरम, शिवा भोये आदी उपस्थित होते.

हेही वाचा…भाजपला रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडीत वादच सुरू

प्लास्टिक कचऱ्याची उचल

साल्हेरच्या प्रेमात गुजरातच्या सुरत येथील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य पडले आहेत. संस्थेचे सदस्य असलेल्या युवावर्गाकडून काही महिन्यांपासून दर महिन्याला साल्हेर किल्ल्यावर येऊन स्वच्छता मोहीम केली जाते. ही सर्व मंडळी गुजरातमधील विविध आस्थापनांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. गिर्यारोहणासाठी येणाऱ्या या युवावर्गाकडून किल्ल्यावर पर्यटकांकडून करण्यात येत असलेला प्लास्टिक कचरा गडाखाली आणण्यात येतो.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तपासणी व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या साल्हेर किल्ल्याकडे स्थानिक प्रशासनाचे विशेष लक्ष नाही. तसेच नियंत्रण नसल्याबाबत संस्थेचे वैभव नायक यांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक, गिर्यारोहकांची किल्ल्यावर जाताना आणि येताना तपासणी व्हावी, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, आमदार बोरसे यांनी साल्हेरचे सरपंच मधुकर भोये यांना बोलावून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तपासणीची व्यवस्था उभारण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव तत्काळ पाठवावा. त्यानुसार त्या प्रस्तावास शासन स्तरावरून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून परवानगी घेतली जाईल, असे आश्वासित केले.

Story img Loader