नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे राष्ट्रीय युवक महोत्सवात २२ जानेवारीपर्यंत मंदिरांची स्वच्छता करण्याच्या आवाहनानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातीत प्रमुख मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि नाशिक पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने नाशिक तालुक्यातील ओढा येथे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. मंदिराची साफसफाई करणे, मंदिर परिसराची स्वच्छता करणे, प्रमुख मंदिरांमध्ये रोषणाई करणे, या बाबींचा अभियानात समावेश आहे. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी, मंदिर विश्वस्त, भजनी मंडळे, सामाजिक संस्था, बचत गट, महिला मंडळे, यांना सहभागी करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानाबाबतच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…

हेही वाचा >>>नाशिक : रस्त्यांच्या कामामुळे पंचवटीत दोन मार्गावर वाहतूक निर्बंध

नाशिक तालुक्यातील ओढा येथे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी गावातील महादेव, लक्ष्मी नारायण, गणपती या मंदिरांच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

जिल्ह्यात १७ आणि १८ जानेवारी रोजी मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून २२ जानेवारीपर्यत प्रमुख मंदिरांवर रोषणाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मित्तल यांनी दिली. ओढा येथे आयोजित मंदिर स्वच्छता अभियानात सरपंच प्रिया पेखळे, उपसरपंच योगेश कापसे, विस्तार अधिकारी श्रीधर सानप, ग्रामपंचायत सदस्य बबन कंक आदी उपस्थित होते.