जळगाव: शेतीत गाळ टाकण्यासाठी मन्याड प्रकल्पातून गाळ वाहतुकीची परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार ३०० रुपये स्वीकारताना चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागाचा लिपिक शुक्रवारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळ्यात अडकला. तुषार पाटील (३६, रा. चाळीसगाव) असे लाचखोर दप्तर लिपिकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नांदगाव (जि. नाशिक) येथील तक्रारदारांचा ट्रॅक्टर व शेतीचा व्यवसाय असून, तक्रारदारांना त्यांच्या आजोबांच्या शेतीत गाळ टाकायचा होता. त्यांनी मन्याड धरण प्रकल्पातून गाळ वाहतुकीची परवानगी हवी होती. त्यासाठी त्यांनी चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागात अर्जही दिला. मात्र, गाळ वाहतुकीची परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभागातील दप्तर लिपिक तुषार पाटील यांनी १३ हजार ३०० रुपये लाचेची मागणी केली. त्यासंदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली.

हेही वाचा… मृतांच्या खात्यातूनही पैसे वर्ग; बनावट स्वाक्षरी, अंगठा घेत धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेत अपहार

त्या अनुषंगाने त्यांनी नियुक्त केलेल्या पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, हवालदार राजन कदम, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, सुधीर मोरे आदींच्या पथकाने सापळा रचत पाटील यास तक्रारदाराकडून १३ हजार ३०० रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात कण्यात आला.