जळगाव – शिधापत्रिकेतील आई आणि मुलाचे नाव कमी करण्यासाठी तसेच नवीन शिधापत्रिका तयार करून देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारताना बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा लिपिक जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. उमेश बळीराम दाते (55, रा. बोदवड) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : उड्डाण पुलाखाली विक्रेते, वाहनतळांनी विद्रुपीकरण; अतिक्रमण हटविण्याची सूचना

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील तक्रारदारास शिधिपत्रिकेतील आई आणि मुलाचे नाव कमी करून नवीन शिधापत्रिका तयार करावयाची होती. त्यांनी बोदवड येथील तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा केली. मात्र, लिपिक उमेश दाते (५५) याने काम करण्यासाठी एक हजाराची मागणी केली. तक्रारदाराने त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने बोदवड तहसील कार्यालयात सापळा रचत एक हजाराची लाच स्वीकारताना लिपिक दाते यास रंगेहात पकडले. त्याला अटक करण्यात आली असून, बोदवड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clerk of tehsil office arrested for accepting bribe by anti corruption department in jalgaon zws
Show comments