नाशिक – शहरात २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निलगिरी बाग येथील हेलिपॅड ते पंचवटीतील तपोवनातील कार्यक्रम स्थळ असा साधारणत: दोन किलोमीटरचा रोड शो होणार आहे. विशेष संरक्षण दलाकडून (एसपीजी) परिसराचे सुरक्षेच्या दृष्टीने अवलोकन केल्यानंतर रोड शोचा मार्ग निश्चित होईल. महोत्सवाची अहोरात्र तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दुपारी येथे दाखल होत आहेत.

विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होत आहे. त्याचे उद्घाटन तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या स्थळासह परिसराचे संपूर्ण चित्र पालटले जात आहे. पंतप्रधान मोदी हे विमानाने ओझर विमानतळावर येतील. तेथून हेलिकॉप्टरने शहरात दाखल होतील. कार्यक्रम स्थळापासून जवळच असणाऱ्या निलगिरी बाग येथे हेलिपॅड उभारण्यात आले आहे. पंतप्रधानांचा शहरातील कार्यक्रम दीड तासांचा आहे. हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळ असा दोन किलोमीटरचा रोड शो होईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
National Youth Festival preparation
छायाचित्र – नाशिक येथील तपोवन मैदानात सुरु असलेली राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी

हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळ या दरम्यान दोन ते तीन प्रमुख मार्ग आहेत. यातील कुठल्या मार्गावर रोड शो होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कोणता मार्ग योग्य असेल याचा विचार करून ते निश्चित होईल असे शर्मा यांनी नमूद केले. महोत्सवाच्या तयारीसाठी स्थानिक पातळीवर २० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ७५ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली गेली आहे. महोत्सवातील विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनासाठी शहरात सहा स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यासह पाच दिवसीय कार्यक्रमांची समांतरपणे अतिशय वेगात तयारी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले. युवकांचा हा महोत्सव असून त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. संबंधितांना कार्यक्रमात प्राधान्याने पुढील जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले. युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दुपारी नाशिकमध्ये येत आहेत. कार्यक्रम स्थळांची पाहणी केल्यानंतर ते आढावा बैठक घेतील.

हेही वाचा : “नाशिकमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचे तंबू, मोठे कंटेनर्स अन्…”; मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कामांना वेग

सद्यस्थितीत तपोवनात पंतप्रधान मोदींचा ताफा जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. महोत्सवस्थळी भिंतीसारखा काही कंटेनरांचा वापर करण्यात येणार असून त्यांच्यावर महोत्सवाचे शुभंकर, बोधचिन्ह रेखाटण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता अभियान यानिमित्ताने राबविण्यात येत आहे.