द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ढगाळ वातावरणामुळे दोन-तीन दिवस गायब झालेल्या थंडीचे गुरुवारी इतके जोरदार पुनरागमन झाले की, पारा ५.७ अंश या नीचांकी पातळीपर्यंत घसरला. चोवीस तासांत तापमान सुमारे सात अंशांनी कमी झाले. कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढली आहे. शहराच्या तुलनेत निफाडमध्ये तापमान अधिक घसरले. त्यामुळे द्राक्ष बागा संकटात सापडल्या असून परिपक्व द्राक्षांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे. द्राक्ष बागांमध्ये शेकोटी पेटवून प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
दिवाळीपासून शहर-परिसरात थोडय़ा फार प्रमाणात गारवा अनुभवता येत आहे. डिसेंबरमध्ये तापमानाने नीचांकी पातळी गाठण्यास सुरुवात केली. उत्तर भारतातील शीत लहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. दरम्यान थंडीने आपले अस्तित्व अधोरेखित करण्यास सुरुवात केली आहे. ११ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये ९.४ तापमानाची नोंद झाली. १९ डिसेंबर रोजी ते ७.९ अंशापर्यंत खाली उतरले. वातावरणात कमालीचा गारवा पसरला. या पातळीत काहीशी चढ-उतार झाल्यानंतर २६ तारखेला ते १२.६ अंशावर गेले होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवत नव्हता. यामुळे दोन-तीन दिवस वाढलेले तापमान गुरुवारी ६.९ अंशांनी खाली घसरले आणि नव्या नीचांकी तापमानाची नोंद करणारे ठरले. थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. सध्या उत्तर भारतात शीत लहर पसरली आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. तापमानात लक्षणीय घट होऊन सर्वाना हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दैनंदिन कामाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटविल्या जात आहेत. भारनियमनाची वेळ सांभाळून शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री शेतात काम करावे लागत आहे.
थंडीमुळे शहर-परिसर, ग्रामीण भाग गारठला आहे. दर वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास नीचांकी पातळीची नोंद होते. यंदा ती डिसेंबरच्या अखेरीस झाली. गेल्या हंगामात २५ जानेवारी २०१८ रोजी ७.२ या नीचांकी तापमानाची नोंद झाली. २०१६ च्या हंगामात ५.५ अंश हे नीचांकी तापमान होते. या वर्षी डिसेंबरच्या मध्यावर तापमान कमी झाले आहे. यामुळे तापमान यापेक्षा आणखी खाली जाईल काय, याबद्दल उत्सुकता आहे.
द्राक्षबागांना शेकोटीचा आधार
कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. परिपक्व झालेल्या, साखर उतरलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीचा परिणाम द्राक्षाच्या विकासावर होईल. द्राक्ष बागांची वाढ संथ होते. द्राक्षमण्यांना फुगवण मिळत नाही. यामुळे द्राक्षघडांचे वजन कमी भरते. निफाड तालुक्यातील शिवडी, उगाव, कुंदेवाडी, नैताळे, आंबेवाडी खडक माळेगाव आदी परिसर द्राक्षबागांनी व्यापलेला आहे. द्राक्ष घडातील मण्यांचा विकास होण्याच्या कालावधीत द्राक्षबागांना विविध प्रकारची खते दिली जातात. ही कामे सुरू असताना तापमान घसरल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. या पाश्र्वभूमीवर, ठिकठिकाणच्या द्राक्ष बागांमध्ये शेकोटीचा आधार घेऊन गारवा कमी करण्याची धडपड सुरू आहे. थंडीचा दुभत्या जनावरांवरही परिणाम झाला असून दूध उत्पादन काही प्रमाणात घटले आहे.