जळगाव कृषी विभागाच्या पीक प्रात्यक्षिक योजनेंतर्गत तालुक्यातील आसोदा व भादली या शिवारात हुरडा पीक प्रात्यक्षिक पाहणीनिमित्त शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह कृषी अधिकार्‍यांनी हुरड्याचा आस्वाद घेतला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढायला हवे यासाठी काहीतरी करण्याची तळमळ व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नाशिक : वन्यजीवांचे अवयव विकणाऱ्या दुकानदाराविरुध्द कारवाई

तालुक्यातील आसोदा व भादली या गावांत राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या पीक प्रात्यक्षिक योजनेंतर्गत हुरडा पिकासह ज्वारी पिकाच्या पाहणीनिमित्त शुक्रवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासोबत बोरीच्या झाडाखाली खाटेवर बसून हुरडा पार्टी रंगली. त्यांच्यासमवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, पोकरा योजना विभागाचे संचालक कुरबान तडवी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, धीरज बढे, नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी, भादली बुद्रुक येथील सरपंच मिलिंद चौधरी, योगेश वाणी, परेश लोखंडे, संजय ढाके, शरद नारखेडे, संजय पाटील, जितेंद्र भोळे, हर्षल बर्‍हाटे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा- त्र्यंबकेश्वर: शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा ‘तो’ व्हिडिओ खोटा; पोलिसांनी तीन पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला

सुरुवातीला जिल्हाधिकारी मित्तल यांनी रब्बी ज्वारी, दादरविषयी माहिती जाणून घेत हुरडा काढण्याची पद्धत व हुरड्याबद्दलची वैशिष्ट्ये समजून घेतली. त्यानंतर सर्वांशी संवाद साधत चुलीवरील गरम केलेल्या हुरड्याचा आस्वाद घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी हुरड्याचा आस्वाद घेतला. नंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी विविध विषयांवर संवाद साधत मार्गदर्शन केले. याप्रसंगी परेश लोखंडे, भादली बुद्रुक येथील सरपंच मिलिंद चौधरी यांनी भादली शिवारातील कोवळा हुरडा आणला होता. वन्यप्राण्यांच्या शेतांच्या नुकसानीबद्दल होणार्‍या कार्यवाहीबद्दल जिल्हाधिकारी मित्तल यांनी माहिती दिली.

हेही वाचा- जळगाव: मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास जबाबदारी निश्‍चित करणार; जिल्हाधिकारी मित्तल

शेतमालक रामकृष्ण चौधरी यांच्या बोरांचा जिल्हाधिकारी मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांच्यासह कृषी अधिकार्‍यांनी आस्वाद घेतला. नंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला भेट देण्याची जिल्हाधिकारी मित्तल यांनी इच्छा व्यक्त केली. स्मारकाची पाहणी करून त्यांनी त्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याची ग्वाहीही दिली.