महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत आणि इयत्ता १० वीची परीक्षा दोन ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे होवून परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.जिल्ह्यात इयत्ता १२ वी परीक्षेसाठी १०८ केंद्रांवर ७४ हजार ९३२ तर, इयत्ता १० वीच्या २०३ केंद्रांवर ९१ हजार ६६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, शांततेत आणि कॉपीविरहीत पार पडण्याकरिता शिक्षण विभागासह महसूल आणि जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर विभागांकडून संनियंत्रण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची अतिसंवेदनशील, संवेदनशील, उपद्रवी व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात आली असून कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी हे परीक्षा कालावधीत केंद्रांवर आकस्मितपणे भेटी देणार आहेत.
नाशिक: काॅपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणे आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत आणि इयत्ता १० वीची परीक्षा दोन ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-02-2023 at 20:51 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector suggestion that copy free examination campaign should be implemented effectively nashik amy