धुळे – सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करावा, यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे लाक्षणिक संप करण्यात आला. शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जळगाव : मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी स्थानबद्ध

संपात शालीग्राम गर्दे, नितीन कोष्टी, राहुल वाघ, कृष्णराव पाटील, राजेंद्र दिसले,अंकुश गायकवाड आदींसह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. लाभाची योजना विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२० अखेर प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला, त्या दरम्यानची फरकाची थकबाकी १,४१० विद्यापीठ शिक्षकेतरांना लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करणे, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर संघटनेचे सरचिटणीस ऋषिकेश चित्तम, अध्यक्ष जी. वाय. पाटील यांची स्वाक्षरी आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College non teaching staff strike in dhule zws