नाशिक – साधू-महतांच्या मागण्या आणि सुचनांनुसार त्र्यंबकेश्वरच्या आराखड्यात बदल करण्याचे काम अद्याप झालेले नाही. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने हे काम तातडीने पूर्ण करून आराखडा तयार करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

कुंभमेळ्याची आढावा बैठक पार पडली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने सुमारे ११५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. मागील महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत साधू-महंतांनी विविध सूचना केल्या हो्त्या. संभाव्य गर्दी, त्र्यंबकेश्वर शहर व कुशावर्त परिसरातील अरुंद जागा पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरालगत गोदावरी नदीवर नवीन घाट, त्या परिसरात नवीन सुविधा तसेच नवीन कुंड उभारण्याची मागणी

केली आहे. शासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. साधू-महंतांच्या मागण्यांच्या अनुषंगाने आराखड्यात बदल करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, हे काम अद्याप झालेले नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. साधू-महंतांच्या सूचनांचा अंतर्भाव करून लवकरात लवकर आराखडा तयार करावा, असे निर्देश डॉ. गेडाम यांनी दिले.