काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली. सत्यजीत तांबेंवरही निलंबनाच्या कारवाईची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबेंनी भाजपाकडे मदत मागितल्याचा मुद्दा उपस्थित करत सडकून टीका केली. याबाबत डॉ. सुधीर तांबेंना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते आज (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर तांबे म्हणाले, “यात बराच गुंता झाला आहे. पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचा आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही. सध्या आमच्या पक्षश्रेष्ठींनाही याबाबत बरेच गैरसमज झालेले दिसत आहेत. त्याबद्दल आम्ही सविस्तर निवेदन करू.”

“शुभांगी पाटील आणि माझाही काहीच संपर्क नाही,”

“जंगले की पाटील याबाबत मी काहीच सांगू शकणार नाही. त्याबाबत मला काहीच कल्पना नाही. मी प्रचारातच आहे. गिरीश महाजन शुभांगी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत की नाही याचीही मला काही कल्पना नाही. मला याचा संदर्भही माहिती नाही. शुभांगी पाटील आणि माझाही तशा अर्थाने काहीच संपर्क नाही,” असं मत सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

व्हिडीओ पाहा :

“सत्यजीत तांबे किंवा आम्ही कोणीही भाजपाचा पाठिंबा मागितला नाही”

“सत्यजीत तांबेंनी भाजपाचा पाठिंबा मागितला होता याबाबत विचारला असता यावेळी सुधीर तांबे म्हणाले, “सत्यजीत तांबे किंवा आम्ही कोणीही भाजपाचा पाठिंबा मागितलेला नाही आणि आम्ही भाजपाचा पाठिंबा मागणारही नाही,” असं सुधीर तांबे यांनी म्हटलं.

हेही वाचा : Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सत्यजीत तांबे काय म्हणाले होते?

दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले होते, “काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.”

“मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे”

“सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी. मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे. तसेच त्यांनी मला मदत करावी अशी विनंती करणार आहे,” असंही सत्यजीत तांबे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “…म्हणून मी माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”, सुधीर तांबेंनी सांगितलं कारण

“…म्हणून बाळासाहेब थोरात उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते”

विशेष म्हणजे सत्यजीत तांबे उमेदवारी अर्ज भरताना बाळासाहेब थोरात उपस्थित नव्हते. याबाबत विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांची तब्येत ठीक नाही. म्हणून ते आज उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते. ते आणि धनंजय मुंडे एकाच रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी गेले आहेत. ते दोघेही ब्रिचकँडी रुग्णालयात आहेत.”

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rebel sudhir tambe say we did not seek bjp support in nashik election rno news pbs