हिंदू धर्माच्या उत्सवांवर या ना त्या प्रकारे प्रतिबंध घातला जातो. दुसरीकडे अल्पसंख्याकांच्या उत्सवाला सवलत दिली जाते. काही संस्था जाणीवपूर्वक हिंदू धर्म, साधुमहंतांची बदनामी करीत भाविकांची श्रद्धा संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याद्वारे हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप नाणीज् पीठाचे नरेंद्राचार्य महाराज यांनी केला. दुष्काळी स्थितीत शाही स्नानासाठी धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले.
बुधवारी भव्य शोभायात्रा काढून नरेंद्राचार्य महाराजांच्या हस्ते गोदापूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हिंदू धर्मीयांच्या सण-उत्सवांवर विविध प्रकारे येणाऱ्या नियमनाविषयी आपले मत मांडले. दहीहंडी, गणेशोत्सव या उत्सवांसाठी अलीकडेच नियमावली आखून दिली गेली. या संदर्भाने त्यांनी अल्पसंख्याकांच्या सणोत्सवाला प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या उत्सवांचे विपणन केले जाते. मात्र, हिंदूधर्मीयांच्या सणांवर नियमांची बंधने लादली जात असल्याचे नमूद केले. काही मंडळी व संस्था वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू धर्म व साधुमहंतांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामागे त्यांचा उद्देश भाविकांची असणारी श्रद्धा नष्ट करणे, हा आहे. श्रद्धा संपुष्टात आली की, धर्म संपुष्टात येईल. हिंदू धर्माला नष्ट करण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात ३०० हून अधिक गाव व पाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या स्थितीत
सिंहस्थात धरणातील पाणी सोडणे कितपत योग्य आहे, या प्रश्नावर नरेंद्राचार्य महाराजांनी शाही पर्वणीच्या दिवशी पाणी सोडणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा