सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आरोप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर सूड बुद्धीने गुन्हे दाखल करून काही मराठाद्वेषी पोलीस अधिकाऱ्यांच्या हातून आरक्षण चळवळ संपविण्याचे राज्य सरकारचे षड्यंत्र असल्याचा आरोप जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या निदर्शनावेळी करण्यात आला. मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर आयुक्तालयातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करत असताना आयुक्तालय किंबहुना राज्य सरकार अशा अधिकाऱ्यांना जाब विचारत नसल्याने मराठा क्रांती मोर्चात सरकारच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या काठीने आंदोलन चिरडता येणार नाही. ही निदर्शने शांततेत पार पडली असली तरी सरकारने मराठा समाजाच्या भावनांना पुन्हा डावलण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात क्रांती मोर्चाची आंदोलने तीव्र होतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये १२ टक्के जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी वाढवाव्यात, मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती आणि इतर कोणतीही नोकरभरती करण्यात येऊ नये, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नयेत, ११ ऑक्टोबर आणि नजीकच्या काळात होत असलेल्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा,
मराठा समाजास हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. आंदोलनात करण गायकर, शिवाजी सहाणे, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.