लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव : नवीन बांधलेल्या घरासाठी मीटर बसविण्यापूर्वी दिलेली दंडाची रक्कम भरावी, त्यानंतरच मीटर मिळेल, असा निरोप दिल्यानंतर कंत्राटी वायरमनने प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून अटक केली. प्रशांत जगताप (३३, रा. जळगाव) असे लाचखोर कंत्राटी वायरमनचे नाव आहे.
शहरातील तक्रारदारांनी घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यांनी घराला मीटर बसविण्यासाठी महावितरण कंपनीकडे यापूर्वीच अर्ज केला होता; परंतु त्यांनी मीटर बसविले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली होती. भेटीनंतर त्यांना आता दंडापोटी चार लाख ६० हजार रुपये भरले तरच वीजमीटर बसवून मिळेल, असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदारांनी कंत्राटी वायरमन जगताप यांची भेट घेत त्यांच्याशी बोलणी केली. त्या अनुषंगाने एक लाख ६० हजार रुपयांत प्रकरण मिटवतो, असे सांगून लाचेची मागणी केली होती.
आणखी वाचा-मनमाड-दौंड रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम शेतकऱ्यांकडून बंद
त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्याकडे तक्रार दिली. त्याअनुषंगाने तक्रारीच्या पडताळणीसाठी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, बाळू मराठे, राकेश दुसाने यांच्या पथकाने मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी कंत्राटी वायरमन जगताप यास एक लाखाची रक्कम स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जगतापविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.