लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : खाद्य पदार्थांचा स्वाद वाढविणारी कोथिंबीर सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने कोथिंबिरीचे नुकसान होत असल्याने शहरात घाऊक बाजारातील आवक निम्म्याहून अधिकने घटली आहे. परिणामी तिला सरासरी १७० रुपये जुडीपर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेता पुढील आठ ते १० दिवस भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

भाजीपाल्याच्या मुख्य घाऊक बाजारात म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संपूर्ण जिल्ह्यातून कोथिंबीर येते. समितीत लिलाव झाल्यानंतर व्यापारी माल मुंबईसह उपनगरे आणि गुजरातला पाठवतात. पावसात कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात होणारी नियमित आवक ६० ते ६५ टक्क्यांनी घटली असल्याचे व्यापारी मोहन हिरे यांनी सांगितले. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बाजार समितीत २६ हजार ५०० जुड्यांची आवक झाली. यात गावठी कोथिंबीरला प्रति जुडी सरासरी १७० रुपये (किमान ३० ते कमाल २५१) तर संकरित कोथिंबीरला सरासरी १६० रुपये (किमान २५ ते कमाल २१५) दर मिळाले. पावसामुळे ओलसर माल लगेच खराब होतो. काही भागात पाऊस उघडल्याने आवक काहीअंशी सुरू झाल्याचे समितीचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-Video: नाशिकमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग, दोन जण जखमी

स्थानिक पातळीवर कोथिंबीरची आवक कमी असल्याने मुंबईसह इतरत्र माल पाठविण्यास मर्यादा आल्याचे व्यापारी सांगतात. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या पाच, सहा काड्या ४० ते ३० रुपयांना मिळत आहेत. अशा स्थितीत गृहिणींनी खरेदीत हात आखडता घेतल्याने अनेक घरातील भोजनातून कोथिंबीरला सक्तीची सुट्टी मिळाली आहे. पुढील काही दिवस ही स्थिती राहील. नंतर मात्र मोठ्या प्रमाणात आवक होऊन दर गडगडतील, असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे.