लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभाग प्रयत्नरत असला तरी या कामात सक्रिय योगदान देणारे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच मिळत नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

करोनामुळे शहरात निर्माण झालेली स्थिती, महापालिकेची अपुरी व्यवस्था, खासगी रुग्णालयांकडून चाललेली लूट, औषधांची कृत्रिम टंचाई आदी मुद्यावरून बैठकीत वादळी चर्चा झाली. याचवेळी महापालिकेने करोनाच्या पाश्र्वभूमीवर, वैद्यकीय विभागात सहा महिन्यांसाठी कंत्राटी स्वरूपात नियुक्त केलेले १५ डॉक्टर आणि वॉर्डबॉयला दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. महापालिकेला फिजिशियनची गरज आहे. पण, दोन महिने वेतन मिळाले नाही तर काम कोण करणार, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी संबंधितांचे वेतन रखडल्याचे मान्य केले. लेखाशीर्षांतील बदल आणि अनेकांचे पीएफ क्रमांक न मिळाल्याने वेतन रखडले. दोन दिवसात हे वेतन दिले जाईल असे त्यांनी सांगितले. नवीन डॉक्टर, कर्मचाऱ्यांना करोना रुग्णालयात पाठवले तर ते नियुक्त होत नाही. काम सोडून जातात. त्यामुळे त्यांना आधी फिव्हर क्लिनिकमध्ये नियुक्त केले जाते. आवश्यक ते डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी महापालिका खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा करत असल्याचे ते म्हणाले.

महापालिकेत दोन वैद्यकीय अधीक्षक पदे मंजूर असल्याचा मुद्दा सदस्यांनी मांडला. हे पद भरल्यास करोना नियंत्रणाच्या कामाची जबाबदारी विभागली जाईल.

वैद्यकीय विभागास मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. फिजिशियनची पदे भरली जात नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन सभापतींनी तातडीने भरती मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

रेमडेसिवीरचा काळाबाजार ?

करोना उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधांचा शहरात काळाबाजार सुरू असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केली. रेमडेसिवीरची कृत्रिम टंचाई करून जादा भावाने त्याची विक्री होत आहे. मोठय़ा खासगी रुग्णालयांमध्ये हे औषध मिळते, इतरत्र ते मिळत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. शहरात आजवर किती औषधांचा पुरवठा आणि विक्री झाली, त्याचा साठा किती आहे याबद्दल माहिती देण्याची मागणी करण्यात आली. यावर वैद्यकीय विभागाने उपरोक्त औषधांवर आपले नियंत्रण नसल्याचे सांगितले. अन्न, औषध प्रशासन विभागाचे त्यावर नियंत्रण आहे. या संदर्भात माहिती घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

प्राणवायूच्या अतिरिक्त ४०० खाटांचे नियोजन

खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांची प्रचंड लूट होत असून महापालिकेने नेमलेल्या लेखा परीक्षकांचाही फारसा उपयोग होत नसल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. नाशिकरोड भागात एका रुग्णालयाने करोना उपचारासाठी नव्याने पाच ठिकाणी रुग्णालये सुरू केली. एखाद्या रुग्णालयास इतक्या तातडीने रुग्णालय सुरू करणे कसे शक्य होते, रुग्णांची कशा प्रकारे लुबाडणूक होते, त्याचे हे उदाहरण असल्याकडे महिला सदस्याने लक्ष वेधले. महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था, साधने नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गंगापूर, तपोवनातील रुग्णालय बंद ठेवावी लागली आहेत. यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आरोग्य, वैद्यकीय विभागाकडून बिटको रुग्णालयात नव्याने प्राणवायूच्या २०० अतिरिक्त खाटांचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयात आधीच २०० प्राणवायूच्या खाटा  नियोजित असून त्यात आणखी २०० खाटांची भर पडणार आहे. या शिवाय संभाजी स्टेडिअममध्ये करोना काळजी केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. तिथेही प्राणवायूची सुविधा असणाऱ्या २०० खाटांची व्यवस्था केली जाईल. गरज भासल्यास मीनाताई ठाकरे स्टेडिअममध्ये करोनाबाधितांवर उपचाराची व्यवस्था केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.